Guru Charitra Adhyay 11 | गुरुचरित्र अध्याय ग्यारह
गुरुचरित्र अध्याय 11 में बताया गया है कि कैसे गुरु के चरणों में समर्पण करने से सभी दुखों से मुक्ति मिलती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु को अपना सर्वस्व समर्पण कर देना चाहिए और उनकी आज्ञा का पालन करना चाहिए। गुरु के चरणों में समर्पण करने से हमें जीवन में सभी तरह के दुखों से मुक्ति मिलती है और हम सुखी जीवन जी सकते हैं। इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक राजा को गुरु के चरणों में समर्पण करने से सभी दुखों से मुक्ति मिलती है। राजा बहुत धनी और शक्तिशाली था, लेकिन वह अपने जीवन में सुखी नहीं था। वह हमेशा दुखों से घिरा रहता था। एक दिन, राजा गुरु से मिला और उनसे अपने दुखों से मुक्ति पाने का रास्ता पूछा। गुरु ने राजा को बताया कि वह केवल गुरु के चरणों में समर्पण करने से ही अपने दुखों से मुक्ति पा सकता है। राजा ने गुरु की आज्ञा का पालन किया और अपने आप को गुरु के चरणों में समर्पित कर दिया। गुरु के चरणों में समर्पण करने से राजा के सभी दुख दूर हो गए और वह सुखी जीवन जीने लगा।
🙏 Daily Guru Charitra पाठ और PDF अपडेट WhatsApp पर पाने के लिए अभी जुड़ें
📲 Join Guru Charitra WhatsApp Channel
📚 सम्पूर्ण गुरु चरित्र eBook
यदि आप सभी अध्याय एक साथ पढ़ना चाहते हैं, तो हमारी Complete Guru Charitra eBook (PDF) अभी खरीदें और आध्यात्मिक ज्ञान को अपने पास सुरक्षित रखें।
📘 Buy Complete eBook
🛒 Amazon पर गुरु चरित्र पुस्तक
यदि आप Printed Book या Kindle Version पसंद करते हैं, तो Amazon से गुरु चरित्र पुस्तक अभी प्राप्त करें।
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी ।
विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥ 1 ॥
सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा ।
पूर्वी वृतांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्रियेची ॥ 2 ॥
शनिप्रदोषीं सर्वेश्र्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं ।
देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळी ॥ 3 ॥
झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं ।
वाजसनीय शाखेसी । विप्रकुळी जन्मली ॥ 4 ॥
जातक वर्तले तियेसी । नाम ‘ अंबा-भवानी ‘ ऐसी ।
आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरी परियेसा ॥ 5॥
वर्धता मातापित्यागृही । वाढली कन्या अतिस्नेही ।
विवाह करिती महोत्साही । देती विप्रासी तेचि ग्रामी ॥ 6॥
शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया ‘ माधव ‘ जाण ।
त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतीकरुनि ॥ 7॥
तया माधवविप्राघरी । शुभाचारें होती नारी ।
वासना तिची पूर्वापरी । ईश्र्वरपूजा करीतसे ॥ 8 ॥
पूजा करी ईश्र्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसी ।
प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्सर ॥ 9 ॥
मंदवारी त्रयोदशीसी । पूजा करिती अतिविशेषी ।
तंव वत्सरें झाली षोडशीं । अंतर्वत्नी झाली ऐका ॥ 10 ॥
मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी ।
उत्तम डोहळे होती तियेसी । ब्रह्मज्ञान बोलतसे ॥ 11 ॥
करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती ।
अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥ 12 ॥
ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं ।
पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होती मातापिता ॥ 13 ॥
जन्म होतांचि तो बाळक । ‘ ॐ ‘कार शब्द म्हणतसे अलोलिक ।
पाहूनि झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥ 14 ॥
जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षणा दान ।
ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥ 15 ॥
सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषी ।
कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥ 16 ॥
याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्र्वासी ।
याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥ 17 ॥
अष्टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं ।
नव निधि याच्या घरी । राहती ऐक द्विजोत्तमा ॥ 18 ॥
न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत ।
याचे दर्शनमात्रे पतित । पुनीत होतील परियेसी ॥ 19 ॥
होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरंवसी ।
संदेह न धरावा मानसी । म्हणोनि करिती नमस्कार ॥ 20 ॥
म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर ।
याचेनि महादैन्य हरे । भेणे नलगे कळिकाळा ॥ 21 ॥
तुमचे मनी जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा ।
यातें करावें हो जतना । निधान आले तुमचे घरा ॥ 22 ॥
ऐसे जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन ।
जनक जननी संतोषोन । देती दान वस्राभरणे ॥ 23 ॥
सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम ।
दृष्टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोवाळिती ॥ 24 ॥
व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिले म्हणत ।
उपजतां बाळ ‘ ॐ ‘ कार जपत । आश्र्चर्य म्हणती सकळ जन ॥ 25 ॥
नगरलोक इष्टमित्र । पहावया येती विचित्र ।
दृष्टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥ 26 ॥
मायामोहे जनकजननी । बाळासी दृष्टि लागेल म्हणोनि ।
आंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्णसुतें ॥ 27 ॥
परमात्मयाचा अवतार । दृष्टि त्यासी केवी संचार ।
लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥ 28 ॥
वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी ।
नामकरण पुरःसरी । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥ 29 ॥
‘ शालग्रामदेव ‘ म्हणत । जन्मनाम झालें ख्यात ।
नाम ‘ नरहरी ‘ ऐसे म्हणत । उच्चार केला धर्मकर्में ॥ 30 ॥
ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं ।
माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥ 31 ॥
पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडे बाळा ।
एखादी मिळवा कां अवळा । स्तनपान देववूं ॥ 32 ॥
अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक ।
ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥ 33 ॥
स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर ।
वस्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥ 34 ॥
विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणी ।
नमन करिती बाळकाचरणी । माता होय खेळविती ॥ 35 ॥
पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यदें गाय अति हर्षी ।
न राहे बाळक पाळणेसी । सदा खेळे महीवरी ॥ 36 ॥
वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारी ।
वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥ 37 ॥
माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं ।
चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥ 38 ॥
पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी ।
उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळी ॥ 39 ॥
सांगती जाण ज्योतिषी । आराधावे कुलदेवतेसी ।
अर्कवारी अश्र्वत्थपर्णेसी । अन्न घालावे तीनी वेळां ॥ 40॥
एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावे बरव्या विवेके ।
बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥ 41 ॥
हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ ।
विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥ 42 ॥
एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें ।
श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥ 43 ॥
कांही केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता ।
पुत्रासी जाहली वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥ 44 ॥
सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी ।
पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केवीं करावें म्हणोनियां ॥ 45 ॥
विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा ।
उपनयनावें केवळा । अष्ट वरुषें होऊ नये ॥ 46 ॥
मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं ।
मुका असे हा निश्र्चितीं । कैसे दैव झालें आम्हां ॥ 47 ॥
कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्र्वरगौरी आराधिले ।
त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥ 48 ॥
ईश्र्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु ।
न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंती शिवासी ॥ 49 ॥
एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखो स्वप्नेसीं ।
वेष्टिलों होतो आम्ही आशी । आमुते रक्षील म्हणोनि ॥ 50 ॥
नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष ।
काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥ 51 ॥
ऐसे नानापरी देखा । जननी करी महादुःखा ।
जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥ 52 ॥
घरांत जाऊनि तये वेळा । घेऊनि आला लोखंड सबळा ।
हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥ 53 ॥
आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं ।
बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥ 54 ॥
गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा ।
पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥ 55 ॥
अमृतदृष्टीं पाहातां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमी ।
विश्र्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥ 56 ॥
मग पुत्रातें आलिंगोनी । विनविताति जनकजननी ।
तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥ 57 ॥
तुझेनि सर्वस्व लाधलें । बोलतां आम्ही नाही ऐकिलें ।
अज्ञान-मायेनें वेष्टिलें । मुकें ऐसें म्हणों तुज ॥ 58 ॥
आमुचे मनींची वासना । तुवां पुरवावी नंदना ।
तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥ 59 ॥
हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां ।
कटी दावी मौजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥ 60 ॥
संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं ।
मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥ 61 ॥
मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती ।
व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥ 62 ॥
केली आयती बहुतांपरी । रत्नखचित अळंकारीं ।
मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥ 63॥
चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती ।
इष्ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥ 64 ॥
नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार ।
आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥ 65 ॥
नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती ।
द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥ 66 ॥
इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं ।
गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेपरी ॥ 67 ॥
एक म्हणती हो कां भलतें । मिष्टान्न आम्हांसि मिळतें ।
देकार देतील हिरण्य वस्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥ 68 ॥
ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक ।
मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥ 69 ॥
चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी ।
पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥ 70 ॥
मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त ।
सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥ 71 ॥
भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकभावें ।
मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥ 72 ॥
गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केले त्या बाळका ।
सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥ 73 ॥
गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं ।
बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥ 74 ॥
गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊनि आली माता ।
वस्रभूषणें रत्नखचिता । देती झाली तया वेळीं ॥ 75 ॥
पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी ।
बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी । आचारधर्में वर्ततसे ॥ 76 ॥
पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं ।
‘ अग्निमीळेपुरोहितं ‘ उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥ 77 ॥
दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद ‘ इषेत्वा- ‘।
लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥ 78 ॥
तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां ।
‘ अग्नआयाहि- ‘ गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥ 79 ॥
सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं ।
मुके बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥ 80 ॥
यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार ।
म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥ 81 ॥
इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक ।
तुवां उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥ 82 ॥
नव्हती बोल तुझें मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता ।
निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थें आचरावया ॥ 83 ॥
आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं ।
वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥ 84 ॥
ऐकोनि पुत्राचे वचन । दुःखे दाटली अतिगहन ।
बाष्प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥ 85 ॥
निर्जीव होऊनि क्षणैक । करिती झाली महाशोक ।
पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥ 86 ॥
आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं ।
न बोलसी आम्हांसवे याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥ 87 ॥
न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल ।
ईश्र्वरपूजा आले फळ । म्हणोनि विश्र्वास केला आम्ही ॥ 88 ॥
ऐसें नानापरी देखा । पुत्रासी म्हणे ते बाळिका ।
आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥ 89 ॥
ऐकोनि मातेचे वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान ।
नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणे तेंचि असे ॥ 90 ॥
तूंतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारी ।
तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसी ॥ 91 ॥
तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार ।
म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जाहले जातिस्मरण ॥ 92 ॥
पूर्वजन्मींचा वृतांत । स्मरता जाहली विस्मित ।
श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपता । दिसतसे तो बाळक ॥ 93 ॥
देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां ।
श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥ 94 ॥
ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करी वो गुप्ती ।
आम्ही संन्यासी असों यति । अलिप्त असों संसारीं ॥ 95 ॥
याचिकारणें आम्ही आतां । हिंडू समस्त तीर्थी ।
कारण असे पुढे बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥ 96 ॥
येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं ।
पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ 97 ॥
पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्हां जरी जाल ।
आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥ 98 ॥
धाकुटपणीं तुम्हां तापस- । धर्मी कवण आहे हर्ष ।
धर्मशास्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥ 99 ॥
ब्रह्मचर्य वर्षें बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा ।
मुख्य असे, वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥ 100 ॥
मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ ।
मग सन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्र येणेपरी ॥ 101 ॥
ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां ।
विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥ 102 ॥
यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया ।
येणेविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥ 103 ॥
समस्त इंद्रियें संतुष्टवावीं । मनींची वासना पुरवावी ।
तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥ 104 ॥
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरु सांगती त्तवज्ञान ।
ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥ 105 ॥
गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून ।
तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्र विस्तार ॥ 106 ॥
पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका ।
महाराष्ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥ 107 ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Guru Charitra Adhyay 11 PDF Download
इस गुरु चरित्र के अध्याय 11 (Adhyay) को आप यहाँ से PDF फॉर्मेट में मुफ्त डाउनलोड कर सकते हैं। यह PDF उन पाठकों के लिए उपयोगी है जो Guru Charitra Adhyay 11 PDF को ऑफलाइन पढ़ना, सेव करना या दूसरों के साथ शेयर करना चाहते हैं।
⬇️ Download PDF
🙏 अगर आपको यह अध्याय पसंद आया हो, तो Daily Guru Charitra पाठ के लिए हमारे WhatsApp Channel से जुड़ें।
📲 Join WhatsApp Channel